साधारणपणे त्या इंग्रजी शब्दाच्या मराठी प्रतिशब्दाचेच लिंग इंग्रजी शब्दासाठी वापरले जाते / जावे असे वाटते. उदा. रन = धाव. मराठीमध्ये ती धाव असे म्हणण्याची प्रथा असल्यामुळे ती रन.
ती चिठ्ठी = ती मेल
ती पत्रपेटी = ती मेलबॉक्स
(पेटी हाही शब्द इंग्रजी असावा काय? पेटी कॅश बुक असे कुठेतरी वाचल्याचे आठवते)
पण काही काही शब्दांच्या बाबतीत हे नियम वेगळे आहेत असे वाटते. बहुतेक, ते इंग्रजी शब्द तसेच प्रचलित असावेत हे त्याचे कारण असेल.
उदा. तो प्रवेश पण ती ऍडमिशन
ते चक्र / चाक पण ती सायकल.
ते चलच्चित्र पण तो सिनेमा
पणा जे शब्द मराठीत नाहीतच त्यांचे लिंग कसे ठरवले जाते माहीत नही.
उदा. ती ओव्हर
विषय खूप छान आहे. यावर चर्चेचा उहापोह झाला तर तो मनोरंजक ठरेल यात शंका नाही.
--अदिती