'बरोबर' ह्या शब्दाचा शब्दकोशात अर्थ आहे -'सम-समान'
आपण 'बरोबर' ह्या शब्दाला जे अर्थ सांगत आहात ('योग्य', ' रास्त' ) ते खरोखरच 'अचूक' अर्थव्यक्ती करतात का? हा प्रश्न आहे.
उदा.
'त्यानं हिशोब अगदी अचूक केला. ', हे वाक्य योग्य की, 'त्यानं हिशोब अगदी बरोबर केला.'
'तिनं गणीत अचूक सोडवलं., हे वाक्य योग्य की, 'तिनं गणीत बरोबर सोडवलं.'
'दहा अचूक व दोन चूक मिळून आठ गूण मिळाले.'हे वाक्य योग्य की, 'दहा बरोबर व दोन चूक मिळून आठ गूण मिळाले.
गणीत विषयात एकतर 'चूक' तरी असू शकतं किंवा 'अचूक' मग 'योग्य', ' रास्त' हे अर्थ नेमका अर्थ सांगतात का?
परंतु परंपरेने हेच चालतंय असं म्हटलंय तर, शब्दकोशात 'बरोबर' ला 'सम-समान' असंच का लिहिलंय. ह्या चुका शाळेतूनच होताहेत व तेही शिक्षकांकडून. भाषा विषयात 'अचूक' हा शब्द वापरात येऊ शकत नाही कारण कोणतेही विधान हे अचूक नसतं, तर ते जवळ-जवळ अचूक असू शकतं. तिथं 'रास्त','योग्य' हे शब्दप्रयोग ठीक वाटतात.
उदा.
'त्याच वागणं योग्य होतं.', हे वाक्य योग्य की, 'त्याच वागणं बरोबर होतं. ',
'त्यांचे विचार रास्त आहेत.','हे वाक्य योग्य की, 'त्यांचे विचार बरोबर आहेत. '
तुम्हाला भावना व्यवस्थित पोहचल्या असं आपणं म्हटलं खरं, पण आपण मला आजपावेतो मराठी समाजात कोणत्या अर्थाने एखादा विचार बोलला, सांगितला, पोहचविला जातो ते सांगितला. मला हे अर्थ माहीत नव्हते असं नक्कीच नाही. विचारांबरोबरच संभाषणाची गंमत ही मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहचवायची होती.
मला पुढे असं सांगायचंय की, परंपरेने वा नकळत चुका करीत मराठी समाजाने 'बरोबर' हा वा ह्या सारखे अन्य शब्द द्वैअर्थाने वापरणं टाळायला हवंय. नेमका अर्थच विचारांची, भावनांची देवाण-घेवाण व्यक्तीगत पातळीबरोबरच, संगणकीय क्षेत्रासाठी उपयोगी होवू शकेल.
'=' ह्या चिन्हाचा अजून एक अर्थ मी नकळत पणे करत होतो तो म्हणजे - 'Results to'
उदा, - 'दोन अधिक चार फलित सहा' अशी वाक्यरचना आडव्या पद्धतीचे गणीत लहान मुलांना शिकवताना उपयोगात आणले जावे. माझी ही सूचना आपणा सर्वांना कशी वाटते?