मेलबॉक्सच्या बाबतीत 'तो' आणि 'ती' हे दोन्ही वापरले जातात असे वाटते. "माझा मेलबॉक्स अगदी भरला आहे" आणि "माझी मेलबॉक्स भरून वाहते आहे".

"ते चक्र / चाक" हे समजले नाही. ती दुचाकी = ती सायकल. ती चारचाकी = ती कार / मोटार / मारुती / सँट्रो / झेन / इंडिका / मर्सीडीज इ. "ती मारुती" असे (त्या बालब्रह्मचाऱ्याला काय वाटेल याचा विचार न करता) निःसंकोच म्हटले जाते.

तसेच, तो चित्रपट = तो सिनेमा.

"ती ओव्हर" या बाबतीत घोळ आहे खराच. कारण रूपांतर होते "ते षटक"