प्रत्यक्षात पाणलोटक्षेत्रातून येणारे पाणी तलाव भरून टाकते.
तलाव ओसंडून, पाळीवरून वाहू लागतो.
ते पाणी उताराकडे वाहू लागते व त्याचा ओहोळ होतो.
मग ओहोळाचा ओढा, ओढ्याचा नाला आणि नाल्याची नदी होते.
या अर्थाने ताल नदीचा जन्मदाताच ठरतो. म्हणून खरे तर

"ताल जन्म दे नदीसी, नदी पुष्टी दे उदधिसी
उदधी पुष्टी दे कुणासी, कुणी जाणे ना"

असे वर्णन जास्त यथार्थ ठरेल.
मात्र ते मूळ गीताशी कितपत ईमान राखेल ते सांगवत नाही.