श्री. माधवराव,
आपण इथे ही कविता उद्ध्हृत केल्याबद्दल आपले आभार.
... आपल्या सर्वांबरोबर ह्या कवितांची गोडी शेअर करायला मजा येईल.....
वरील वाक्यात "ह्या कवितांची गोडी सर्वजण एकत्र चाखू या" असा बदल सुचवावासा वाटतो.
मा. द्वारकानाथ,
ह्या कविता पूर्वी पाठ्यपुस्तकात होत्याच. आता नवीन काळाप्रमाणे नवीन कविता पाठ्यपुस्तकात येताहेत. बदलत्या काळाचे हे रूप आहे आणि ते प्रगतीचे लक्षण आहे. पुढच्या पाठ्यपुस्तकात कदाचित कविवर्य सुभाषचंद्र, प्रवासी, मिलि.द फणसे यांच्या कविता असतील.
पूर्वी पाठ्यपुस्तकात "भो भो पंचम जॉर्ज" अशी कविता होती. अशा कविता कालबाह्य होतात यात शंका नाही.
माझा हेतू जाणून घ्याल अशी आशा आहे.
कलोअ,
सुभाष