बॉक्स म्हणजे पेटी, म्हणून ती मेलबॉक्स. ज्यांना बॉक्स म्हणजे खोका वाटतो तेच फक्त तो मेलबॉक्स म्हणतील.
ऍडमिशनचा नेहमीचा अर्थ परवानगी. ती स्त्रीलिंगी म्हणून (कधीकधी प्रवेश असा अर्थ असला तरी) ऍडमिशन स्त्रीलिंगी. ऍडमिशन मिळाली म्हणजे शिक्षणसंस्थेत शिकायला परवानगी मिळाली.
ओव्हर म्हणजे एका गोलंदाजाला मिळणारी चेंडू टाकायची पाळी. पाळी स्त्रीलिंगी म्हणून ओव्हर स्त्रीलिंगी.
मेल(आगगाडी) स्त्रीलिंगी, मेल(नर) पुल्लिंगी, मेल(डाक, चिठ्ठी) स्त्रीलिंगी. पण काहीजण तो ईमेल म्हणतात, कारण त्यांच्या मनात मेलचा अर्थ निरोप हा असतो. म्हणूनच ईमेलसाठी विरोप हा पुल्लिंगी शब्द ठरवला गेला असला पाहिजे. -----Shuddha Marathi