'बरोबर'चे कोशातील अर्थः (फार्शी-बराबर्=छातीस छाती लावून) वि १. सारखा, समान; त्याच गुणाचा किंवा परिणामाचा. २. बिनचूक, निर्दोष; यथास्थित; सत्याशी संवादी किंवा जुळणारा. ३. यथायोग्य; असावे तसे; ४. साफ, नितळ. क्रिवि १. सहवर्तमान; संगतीत. २. त्याच वेळी; त्याच खेपेस; त्याच कामात.