काहीच न बोलणारी. बरंच काही आपल्या मनाशीच दडवून बसलेली.
खोलवर कुठंतरी, मनाच्या तळाशी आपल्यातच हरवलेली.
सगळ्या जगाला दिसणारी अबोली आणि प्रत्यक्षात असणारी ’अबोली’ या दोन्ही वेगळ्या असू शकतील ना?
तिचा सालसपणा, अल्लडपणा नजरेत भरतो, मग ती ’अबोली’ का?
की खरोखरचं या नितळ, निखळ, अल्लड अबोलीत एखादी अबोल अबोली दडलेली असेल, जगापासून दूर?
खुललेली अबोली पाहिली की मन टवटवीत होतं, पण ’अबोली’ हे नाव उच्चारल की मन जड होतं. का असं?
कदाचीत कुठल्यातरी गर्तेत गुंतलेली असेलही नेहमीच ती. हे कुणा ना कळे.

फार छान लिहिता तुम्ही. असेच लिहित राहा.