हल्ली तर बाबत ह्या अर्थीही बरोबर शब्द वापरणारे खूप आहेत. माझ्याबाबतीत अमुकतमुक झाले असे सांगण्यासाठी माझ्याबरोबर अमुकतमुक झाले असे सर्रास म्हटले जाते. तसेच बरोबर चा अर्थ सह, सोबत असा असल्यानेही असू शकेल, माझ्यासोबत अमुकतमुक झाले असे म्हणणारेही अनेक आहेत. (अर्थात हे दोन्ही मला आवडत नाही हे वे. सां. न. ल.)