या गणपती विषयी नुकतीच वाचनात आलेली माहिती आशीः

पेशवाईच्या सुरुवातीच्या काळात नारायण पेठेत आज ज्या ठिकाणी मोदी गणपती आहे त्या ठिकाणी त्या काळातील एक धनिक मोदीशेठ खुश्रू यांचे शेत होते. त्याच्या बांधावरी एका चौथऱ्यावर एक पुरातन गणपती मंदीर होते. हा भाग गावाच्या बाहेर असल्या कारणाने या गणपती लगतच मासळी बाजार भरत असे. त्या मुळे या गणपतीला ' बोंवल्या गणपती असेंही म्हणत असत. कालांतराने पेशवाईतील एका सरदाराने या गणपती मंदीराचा जीर्णोद्धार केला व आज दिस्ते ते मंदीर उभे राहिले. त्याचे मोदी गणपती हे नांवही तसेच ठेवले गेले. याचे कारण 'मोद' म्हणजे आनंद व जो मोद देतो तो मोदी गणपती.