>>लोकांच्या तोंडी 'ती मेलबॉक्स' पेक्षा 'तो मेलबॉक्स' हेच रुळले.<< मला नाही वाटत. मेलबॉक्स स्त्रीलिंगी समजणारे बहुसंख्य असावेत.
लेटरबॉक्सला कुणी पत्रांचा खोका म्हटल्याचे ऐकले नाही. हा बॉक्स उचल, हा बॉक्स जड आहे, हे सर्व निर्देश तो बॉक्स खोका आहे हे दर्शवतात. पेटी किंवा संदुकिला कुणी बॉक्स म्हणत नाहीत.
>>ओव्हर म्हणजे एका गोलंदाजाने सलग आणि नियमानुसार टाकलेल्या सहा चेंडुंचा गट<< आत्ता कुणाची ओव्हर आहे? म्हणजे आता कुणाची चेंडू टाकायची पाळी आहे असा अर्थ, गट नाही. ऑक्सफ़र्डच्यामते ओव्हर म्हणजे एका बाजूने चेंडू टाकण्याची समाप्ती(=ओव्हर).
>>ऍडमिशनचा अर्थ परवानगी नसून कोणत्याही ठिकाणी प्रवेश किंवा प्रवेशाची प्रक्रिया << प्रक्रिया नाही. फक्त परवानगी. ऑक्सफ़र्डमते अलाउइंग एंट्रन्स/ऍक्सेस (टु अ पर्सन एटसेट्रा).
शर्ट म्हणजे सदरा किंवा अंगरखा. पैरणी हा शब्द फार जुन्या मराठीत नव्हता, होता तो पहेरण असा. पुढे त्याची पैरणी झाली.