तुझ्या पद्धतीप्रमाणेही करून पाहीन. पाककृतीला नाव पण छान दिले आहेस.

दुवा क्र. १ इथे आदल्या दिवशी उरलेल्या वरणभाताचे थालिपीठ चित्रासहीत आहे.

मी फोडणीच्या भाताला कांदेभात म्हणते. फोडणीमध्ये हिरवी मिरची, भाजलेले दाणे व थोडे लाल तिखट घालून व ते शिजले की भात मोकळा करून घालते. पुरेसे मीठ व चवीला थोडी साखर.

दुवा क्र. २  इथे कांदेभाताचे चित्र आहे.

कांदेभातामध्ये थोडेसे मेतकूट पेरले असताही स्वाद छान येतो. शिवाय भात मोकळा करून त्यात लाल तिखट, धनेजीरे पूड व गोडा/काळा मसाला, मीठ व साखर असे आधी भातामध्ये कालवून ठेवायचे व थोड्यावेळाने हा भात फोडणीस घालायचा. आदल्या दिवशीची कोरडी भाजी उरली असेल तर ही पण फोभामध्ये घालतात.