कळविण्यास अत्यंत आनंद होतो की या प्रस्तावित कार्यक्रमाला विश्व मराठी साहित्य संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये निश्चित स्थान मिळाले असून त्याबद्दलची अधिकृत घोषणा आज बे एरिया महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ज्यांची होती ते मिलिंद भांडारकर यांनी कार्यक्रमाचे संगीतकार ताम्हनकर यांच्यासह याची थोडक्यात माहिती आज करून दिली.

तेव्हा इच्छुक आंतरजालीय कवींनी आतापर्यंत या कार्यक्रमास हातभार लावण्याचे केलेले सत्कार्य असेच चालू ठेवावे, ही नम्र विनंती.