सगळे कसे स्वच्छ माहीत आहे.
प्रत्येक जण माहीत असलेल्या ज्ञानाच्या आधारे काम करू लागला.
नवीन आलेला कोणी, प्रश्न विचारत न बसता, इतरांचे पाहून तसेच करू लागला.
अहाहा! किती छान कल्पना आहे. रस्त्यात एक सुंदर मुलगी चालत आहे. ती खूप आकर्षक आहे. मानवही जनावरच आहे ह्याबाबत जेवढी उपजत माहिती आहे त्यानुसार तिच्याशी अंगलट व्हावेसे वाटू लागले. तिचं चुंबन घ्यावेसे वाटू लागले. तिचा नकार ही उरला नाही. कारण जे घडणार त्याबाबत तीच्या घरीही कुणी विचारणारे नव्हते. समाज ही विचारणार नव्हता. आणि बघता-बघता सगळीच माणसं भर-रस्त्यात आपला कार्यभाग आटोपता घेता येईल. रस्त्यावर कुणीही प्रश्नच विचारणारा नव्हता, आक्षेप घेणारा नव्हता. कारण सगळेजण तेच करीत होते. आणि मग कपडे घालायची गरजच उरली नाही. कुणीही कुठंही लघवी-संडास करू लागला. कुत्री, डुकरं ही मात्र विचारात पडली, ती विचार करू लागली, जर मानव देह मिळून ही हेच करायचं आहे तर 'हे देवा! आम्हाला ही मानव बनव की?'