मराठीत वस्तुवाचक शब्दांचे लिंग अनेकदा वस्तूच्या आकारावरून आणि आकारमानावरून ठरते. टी. व्ही., रेफ्रिजरेटर ज्या बॉक्समधून येतात ते बॉक्स पुल्लिंगी.  त्यांना साध्या मराठीत खोका किंवा पेटारा  म्हणतात. ज्या बॉक्सा छोट्या आणि चपट्या असतात त्या स्त्रीलिंगी. कंपासपेटी, पेन्सिली ठेवायची पेटी, कपड्याची/दागिन्याची पेटी, बाजाची पेटी वगैरे. कुंकवाचा करंडा चपटा नसतो म्हणून पुल्लिंगी, कोयरी स्त्रीलिंगी.  डबा मोठा म्हणून पुल्लिंगी, डबी स्त्रीलिंगी. बॉक्स अत्यंत छोट्या आकारमानाचे  असेल किंवा त्याचे  आकारमान वा आकार माहीत नसेल तर तें(नपुं)बॉक्स. "मला एक खोकें विकत घ्यायचें आहे." बरोबर, कारण किती मोठे ते अजून ठरलेले नाही. टूथबॉक्सचें किंवा औषधाच्या बाटलीचें खोकें.. अशा परिस्थितीत "माझे भरलेलें रिकामें करावयाचें तें(नपुं) मेलबॉक्स" चालेल.  आणि मेलबॉक्स जर हमाल करून डोक्यावरून वाहून नेण्याइतका जड, लांब, रुंद आणि उंच असेल तर तो मेलबॉक्स अन्यथा ती.