हिंदी आयांना 'अपने हाथोंसे' सरसोंका साग आणि मक्कईकी रोटी बनवता येणार नाही. आणि नाश्ता किंवा खाना लगावता येणार नाही. (जणू इतर जण पायाने स्वयंपाक करतात.) अविवाहित नायिकांना होली किआ राखी साजरी करता येणार नाही आणि विवाहितांना कडवा चोथ! घोडनायकांना बी. ए. फर्स्टक्लासमध्ये पास होता येणार नाही आणि 'माँ मुझे ज़ोरोंकी भूक लगी हैं, जल्दी खाना लगाओ' म्हणता येणार नाही. डॉक्टरमंडळी 'इन्हें सख्त आरामकी जरूरत आहे' याहून काहीतरी वेगळा औषधोपचार सुचवतील.