घरात लिंबू नसेल तर त्यांना फोडणीचा भात करणे अशक्य असते..  

मला प्रामाणिक पणे वाटते की त्याच सोबत खवणलेले ओले खोबरे नसेल तरीसुद्धा कारवारी सारस्वतांचा 
फो. भा.  होणेच शक्य नाही.  कारण,  ओले खोबरे, मासे आणि ठिबक कॉफी (फिल्टर कॉफी) हे म्हणजे बहुतांश 
सारस्वतांचा प्राण आहे.   

माझा एक मित्र आहे प्रभू नावाचा,  त्याच्याकडे कधीही जा,  ओल्या खोबऱ्याचे तुकडे घातलेले आप्पे आणि ठिबक 
कॉफी असतेच.  काय लागते ते....  अहाहा...