सुंदर रचना! प्रभावी सादरीकरण!!

आरती परंपरेने शक्तीची, सामर्थ्याची, चांगुलपणाची (स्तुतीरूप) केली जाते.
ज्या व्यक्ती वा अवस्थेची आरती केलेली असेल तिच्याप्रती अनादर, अप्रिती,
अनास्था त्या आरतीमुळे प्रसवत असेल, तर ती आरती विडंबनात्मक समजायला हवी.

म्हणून या कवितेचे नाव "महागाईची आरती" असे हवे होते. तसेच ती "विडंबन" सदरात घालायला हवी होती.

अर्थात्, प्रमोदजी, आपले काव्य विडंबनात्मक असले तरीही सशक्त आणि प्रभावी झालेले आहे यात मात्र संशय नाही.