दिवाळीत उरलेल्या फराळाच्या पदार्थांचे काय करावे हा प्रश्नही आम्हाला सतावतोय त्याबद्दलही काही लिहील्यास आपल्या लेखनाला चार चांद लागतील.
ह्यावर माझ्याकडे काहीही उपाय नाही. कारण हा अनुभवच माझ्यासाठी नवीन असेल. आमच्याकडे दिवाळीचा फराळ
करताना अर्धा संपतो आणि दिवाळीच्या पाचव्या दिवसापर्यंत उरलेल्याचा फडशा पडलेला असतो (आता काही खोचक
लोकांना ह्या पदार्थांच्या वस्तुमानाबद्दल शंका येईल तर त्यांच्यासाठी खास माहिती अशी की हे पदार्थ ५ किलोच्या पटीतच
केले जातात) . कारण आम्ही खादाड व खवैय्ये दोन्ही प्रकारात मोडतो. अडगुलं मडगुलं खाणं आपल्याला तर बुवा
पटतच नाही.