इस्वास,
मी शीर्षकातच म्हटले होतेः अवांतर.
प्रश्न तुमच्या त्रासाचा.
जे आवाज करतात, त्यांना चिकाटीने सतत सांगत राहणे हा त्यावर उपाय आहे. याशिवाय, रीतसर त्यांना पत्र लिहिणे हा अधिक चांगला उपाय आहे. लिखित शब्दांचा परिणाम होतो. सुशिक्षित व्यक्ती असल्यास परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.
संबंधित व्यक्ती तुमच्या इमारतीत राहात असली तरी पत्राचा उपाय लागू होतो. एखादी गोष्ट लिखित स्वरूपात आहे, याला भारतीय जनमानसात खूप महत्व आहे.