लहानपणी गावांतल्या सर्व बायाबापड्या एकत्र जमायच्या आणि सामुहिकपणे एखादी पोथी ऐकायच्या. शिवलीलामृतामधली चिलया बाळाचे आख्यान चालायचे तेंव्हा जवळजवळ सर्वजणी ओक्साबोक्शी रडत असे, एवढेच कशाला पुरूष मंड्ळी सुध्दा चोरुन आपले डोळे पुसून घेत असे.