फोडणीचा भात आणि शिळ्या पोळीचा कुस्करा... आमचाही आवडीचा पदार्थ आहे... कधी कधी ताज्या भातापेक्षा फोडणीच्या भाताला जास्त उड्या पडतात :).... असो...

शिळा सप्तमी च्या निमित्ताने आणखी एक पदार्थाचा उल्लेख करावासा वाटतो... शिळ्या भाताच्या गुलाबजामुनचा.....

आमच्या शेजारी राहणाऱ्या एक गुजराथी भाभी असे शिळ्या भाताचे गुलाबजामुन अगदी बेमालूम करत...

शिळा भात कुस्करून त्याचे छोटे गोळे तेलात तळून झाल्यावर.. गुलाबजामून साठी जसा साखरेचा पाक करतो तशा पाकात भिजत ठेवावे.... शिळ्या भाताचे गुलाबजामून तयार...