१५ ऑगस्टला भारतीय झेंडा सामन्य माणूस विकत घेतो आणि मिरवतो हे जास्त महत्त्वाचे. नंतर त्याचा कचरा झाला आणि रीबॉकचे ठसे पडले का कोल्हापुरी वाहणेचे हे फार महत्त्वाचे वाटत नाही.
ध्वजाची आचारसंहिता म्हणजे पूर्वी सोवळ्या ओवळ्याचे अकारण स्तोम माजवले होते त्यातला प्रकार वाटतो.

१५ ऑगस्टला अमाप पैसे खर्च करून लालकिल्ल्यावर भाषण, संचलन वगैरे उपद्व्याप करायची खरच गरज आहे का? ज्यांना उत्साह असेल त्यांनी करावे. पण अति खर्च कशाला? अमेरिकेत वा अन्य पश्चिमी राष्ट्रात तसे होत नाही म्हणून तिथले देशप्रेम आटले हो म्हणून कुणी गळे काढत नाहीत.