ही नुसतीच जंत्री नाही. (किमान मला असे वाटत नाही). आपण काहीच करत नाही असे त्यांना म्हणायचे आहे. आपली निष्क्रीयता या सर्व परिस्थितीस कारणीभूत आहे असे येथे म्हटले आहे. काय करावे हे जरी स्पष्ट सांगितलेले नसले तरी करायला हवे हे मात्र सुचवले आहे.

आणि शेवटी आपण काय करावे हे काही अंशी प्रत्येकावर अवलंबून आहे. मी कदाचित शिक्षण क्षेत्रात काही करीन तर तुम्ही पायाभूत सुविधांच्या. आणि काय करावे हे सांगणे कवीचे काम नाही. त्याचे काम फक्त समाजाला जाणीव करून देणे. नेतृत्व करणे नव्हे.

असो. फार बोललो. ही कविता मागच्याइतकी नकारात्मक नाही त्यामुळे जरा बरे वाटले. प्रदीप यांच्याशी किंचित सहमत होऊन मी असे म्हणेन की पलायनवादी दृष्टीकोन कवीने कवितेतून मांडणे मला घातक वाटते. अर्थात अभिव्यक्तीस्वातंत्र्यापुढे सर्व माफ. पण याचा विचार करावा.