>>हाती माउस आहे, कळपेटी आहे म्हणून चारमराठी सभाषणाचे नियम बनविणे हा कय पोरखेळ वाटला काय?<<

वस्तुनामाच्या लिंगासाठी काय संकेत आहेत आणि त्या संकेतांवर आधारित नियम बनवता येतील का याची चर्चा इथे मनोगतावर चालू आहे. चारमराठी संभाषणाचे नियम नाहीत.  आणि हाती माउस-कळपेटी आहे म्हणूनच ही चर्चा शक्य आहे. अन्यथा आपण काय करू शकलो असतो? आणखी दुसरे असे की हे संभाव्य नियम केवळ बोली भाषेसाठी नाहीत तर प्रमाण लेखी भाषेसाठी असले पाहिजेत असाच आपला दृष्टिकोन असला पाहिजे.

>>आकारांत किन्वा ईकारांत शब्द स्त्रीलिंगी असतात त्याच आधारे आपणही लिंग ठरवू शक्तो.<< मराठीला हे मान्य नाही. तो वाघ, तो घोडा, तो हत्ती, तो शिंपी, तो खडू, तो टाहो, ती भिंत, ती भानगड, ती जागा, ती शेगडी, ती टपालपेटी(मेलबॉक्स), ती बायको, ती जळू, तें झाड, तें पाणी, तें लिंबू, तें तळे वगैरे वगैरे. -SMR