नव्या दमाचे राज - जाळू, फोडू, हुसकावून लावू हीच -तीही शिवसेनेकडून उधार आणलेली भाषा बोलणारे राज - प्रशासकीय कामाचा तुम्हाला अनुभव नाही तर तुम्ही राज्यकारभार कसा सांभाळणार या राजू परुळेकरांच्या प्रश्नाला साम वाहिनीवर 'प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्या मंडळींनी आतापर्यंत काय केले, उपटले का? ' असा सवाल विचारणारे राज - दगडफेक, काळे फासणे, जाळपोळ आणि बंद ही विरोधाची शस्त्रे बाळगणारे त्यांचे अनुयायी - हिम्मत असेल तर वर्दी, पट्टा आणि बंदूक उतरवून समोर या असे पोलीस आयुक्तांना सुनावणारे राज ठाकरे -आणि त्यांच्या मागे उभे राहावे असा सल्ला देणारे विचारवंत - आनंद आहे!