दर सोमवारी रात्री, खरेतर रात्रभर तथाकथित सिद्धीविनायक भक्तांच्या शिट्टया, आरडाओरडा, किंकाळ्या हा शब्द
जरा सौम्य ठरेल असे भीषण आवाज, रेकल्यासारखी भजने ह्या सर्वांनी आम्हीच नव्हे तर बहुतांश दादरकर मंडळी पार
वैतागून गेली आहेत.
ह्याला भक्ती म्हणावे का?
जिथपर्यंत रांगेचा प्रश्न आहे, मी कीर्ती महाविद्यालयात असताना माझ्या कंपूतील बहुतेक मुलेमुली स्वामीमठात दर
गुरुवारी रांगा लावत असत. प्रत्येक बुधवारी उद्या कुठला साजशृंगार करायचा त्याच्या चर्चा चालत. पुढे १-२ जणांची लग्ने झाली आणि स्वामी भक्तीचे रहस्य उलगडले. एक मात्र खरे, स्वामी दर्शनाला जातो म्हणताच घरून
विरोध होत नाही. पालक मुलींना आढेवेढे न घेता पाठवतात.