लोण्यासाठी सायीचे दही घुसळताना त्यात फ्रिजमधील गार पाणी वा त्याहीपेक्षा बर्फाचे तुकडे घातल्यास गोठण्यास मदत झाल्यामुळे लोणी लवकर वर येते. विशेषतः उन्हाळ्यात ह्याचा उपयोग जास्त होतो, शिवाय नंतर गारेगार ताक प्यायला मिळते हा अधिक फायदा.