चित्त, मिलिंद फणसे आणि अगस्ती यांचे विशेष अभिनंदन. या पुस्तकात कुमार जावडेकर, नीलहंस , प्रवासी, यादगार व सुवर्णमयी  यांच्या गझलांचाही समावेश आहे.  या सर्वांच्या उल्लेख केलेल्या रचना  बहुतेक मनोगतावर प्रकाशित झालेल्या आहेत. चित्त यांची 'ना छचोर शब्दासाठी', फणस्यांची 'अजून हृदयी तिच्या स्मृतींचा खडा पहारा', जावडेकरांची 'जीवनाचा नूर आहे वेगळा या सर्वच गझला वाचकांना आवडाव्या अशा आहेत.  संजोपराव या पुस्तकाविषयी मनोगतावर लिहिल्याबद्दल आभार. तुमच्यामुळे जरा पुस्तक जगात काय सुरू आहे ते तरी आम्हाला कळते. 
मौज, अक्षर, अंतर्नाद या व तुम्हाला आवडलेल्या  इतर दिवाळी अंकातील लेखांवर सविस्तरपणे मनोगतावर लिहावे अशी  एक आग्रहाची विनंती !

सोनाली