देव हा अस्तित्वात नाही. लोकांनी हळूहळू जागे होऊन ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. तो जगातच नाही तर कुठल्या नामांकित देवळात कुठून येणार?
देवाकरता फुले, नारळ, दूध, हळद असल्या उपयुक्त गोष्टींचा अपव्यय करू नये. दगडावर दूध ओतल्याने काय होणार आहे? निचरा व्यवस्थित असेल तर ते गटारात जाईल. नाहीतर तिथेच नासेल आणि देवळाच्या दुर्गंधीत भर टाकेल. देवाची मूर्ती वा पिंड ओशट, घाण होईल ती वेगळीच.
तिरुपती, शिर्डी इत्यादी जागी अमाप पैसे जमतो. त्यामुळे भ्रष्टाचार होतो. सगळेच पैसे काही दानधर्मात खर्च होत नाहीत. विश्वस्त व अन्य वजनदार मंडळी तो पैसा आपल्या खिशात घालतात. कशाला पैसे वाया घालवायचे अशा जागी?
देवाला खुलभर दूधही द्यायची गरज नाही. ते घरातल्या मांजराला दिले तर ते निदान घरातले उंदीर तरी मारेल! देवाला नुसता नमस्कार पुरे आहे!