पुण्यातच काय पण कुठल्याही मराठी घरात आलेल्या पाहुण्याला आपणहून कॉफी देत नाहीत. जर पाहुणा चहा पीत नाही असे समजले किंवा घरात रोज कॉफीच होत असेल तरच कॉफी दिली जाऊ शकेल.  कॉफी आणि केळी ही कधीही न ऐकलेली जोडगोळी. कॉफीत अर्धे पाणी आणि अर्धे दूध इतकी श्रीमंती कॉफी मद्रासी घरांत तरी मिळेल? आणि रोजच्या कॉफीत कुणी वेलदोडे टाकते? फक्त नाटकांच्या किंवा शास्त्रोक्त संगीताच्या बैठकींच्या मध्यांतरांत जी कॉफी असते, ती वेलदोडे आणि जायफळयुक्त असते. शोभाबाईंचा मराठी जगाशी काही संबंध आलेला दिसत नाही. -SM