माझा भ्रमणध्वनीचा हस्तसंच नोकिया २६०० आहे. तो मी दोन वर्षांपूर्वी घेतला. त्यात देवनागरी टंकलेखनाची सोय आहे आणि मी ती प्रत्यही वापरतोही. देवनगरीची सोय केवळ निरोप-लेखनासाठीच नसून अन्य माहितीही देवनागरीतून साठवता येते.मात्र अन्य ज्या  हस्तसंचांवर, जसे मोटोरोला, रिलायन्स इ. ही सोय नाही त्यावर पाठवलेले निरोप त्या धारकांना वाचता येत नाहीत.