लेख खुपच विस्कळीत वाटला. लेखिकेला नक्की कशाबद्दल सा/म्गायचे आहे तेच कळले नाही. इंडिअन क्किजिन/महा. पाहुणचार/ बंगाली पाहुणचार/मराठी कद्रुवृत्ती.. नेमके काय म्हणायचेय हेच कळले नाही. पण ही तिची नेहमीचीच स्टाइल आहे. तिची एक-दोन पुस्तके वाचलीत मी, त्यातही तिला नेमकेपणे काय म्हणायचे ते शेवटपर्यंत कळलेच नाही...
स्टिलच्या भांड्यात पाणी देणं वाईट हे आजच कळलं.. आणि फ्रीज आहे हे दाखवण्यासाठी थंड पाणी देतात हेही माहीत नव्हते....
आजानुकर्णाशी सहमत मलाही सुरवातीला पुण्याबद्दल लिहिलेय असेच वाटले. पण केळं आणि कॉफी हे कॉम्बिनेशन काही ऐकीवात नाही... मराठी घरात चहा घेतला/दिला जातो.. पाहुण्याने खास मागितल्यासच कॉफी दिली जाते.
एकुणच हे सगळे गंभिरपणे घ्यायची आवश्यकता नाही.. लेखिकेनेही स्वतः जे खरडलेय ते परत एकदा वाचून पाहिले नाहीय, तर मग आपण कशाला वाचावे?