"नाठाळाच्या माथी हाणू काठी" हा समर्थ रामदासांचा उपदेश कसा विसरावा ?
के. एल. प्रसादचा प्रमाद (कोणाचा बाप काढणे) खपवून घेतलेला चालतो ! पण राज ठाकरेंची भाषा साहित्यिक नसल्याने ती शेलकी वाटत असावी !
कोणाचा बाप काढणे ह्या सारखा बेमुर्वतखोर पणा अजून काय असेल ? ( एकदा माझ्या दिवंगत वडिलांबद्दल असाच 'बाप' नावाने उल्लेख केला गेला- उल्लेख करणाऱ्याच्या कानाखाली असा जाळ काढला आहे की त्यानंतर तो समोरून गेला तरी मान वर करून बघत नाही.) मी उद्या जर येथेच कोणाला 'बाप' वाचक उद्गार काढले तर ते प्रशासक खपवून घेतील का ???
स्वतः मी कुठल्याही पार्टीचा/पक्षाचा समर्थक नाही - इश्यू बेस्ड सपोर्ट किंवा इश्यू बेस्ड ऑपोज करणे हे नेहमीच परिपक्वतेचे लक्षण आहे. उगीच "ह्या" विषयावर माझे व त्याचे जमले नाही म्हणून तो मांडत असलेल्या प्रत्येक मुद्द्याला आडवे जाणे म्हणजेच व्यक्तिगत विरोध असणे !
असो.....
मुद्दा जया बच्चन च्या बेमुर्वतखोरीचा व त्यावर के. एल. प्रसाद ने तिची चाटूगीरी (खानदेशात चाटू म्हणजे मोठा चमचा ! ) करणे हा आहे. राज ठाकरेंच्याबद्दल जे वाक्य दिले त्याला बातमीचा संदर्भ होता व असेच असेल तर कुमार केतकरांच्या घरावर ठाण्यात हल्ला झाला तेव्हा आबांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले होते त्याबद्दलही थोडे फार वाचायला आवडेल