एका टोपलीत २४ आंबे आहेत तर २ म्हशी किती दुध देतील ? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणी देउ शकणार आहे का ? 
शोभा डे ने सकाळ मध्ये सकाळी सकाळी जे काही दिवे पाजळलेत ते बघून ही बया भाड्याची माणसे लावून लेखन करते की नवटाक ठर्रा मारून लेखन करते अशीच आता शंका आली. 
आजकालचे संपादक खुर्चीवर बसून झोपा काढतात असेच वाटते. लेखाला प्रसिद्धी देण्यापूर्वी लेख वाचत तरी असावेत का ? कमाल आहे ती असे लेख संपादन करून टाकणाऱ्या संपादकाची -
हा लेख सकाळच्या तर सोडा आमच्या मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या दुपारच्या (जो पहाटे ५ ला रे.स्टे. वर उपलब्ध असतो ! ) नवाकाळ मध्येही प्रकाशीत होण्याच्या लायकीचा नाही.  

अवांतर : ती गौतम राजाध्यक्ष ची बहीण आहे हे धक्कादायकच वृत्त आहे. कुठे तो सोज्वळ  (तोंडावरून वाटणारा) माणूस व कुठे ही चवचाल फटाकडी.... खरोखर बहीण का हो ?