तुम्ही माझ्या तोंडची केळी आय मीन घास ओढून घेतला. मला कोणत्याही मराठी/अमराठी घरात स्वतःहून कॉफी घेणार का विचारलेले नाही. (डायरेक्ट देण्याची गोष्टच सोडा) सगळेजण चहाच देतात. उन्हाळ्याचे दिवस असले की 'सरबत घेणार की चहा? ' असे विचारून मग सरबत देतात. घरात रोज कॉफी होत असली तरी पाहुण्याला थेट कॉफी देत नाहीत. विचारुनच देतात. आषाढी/कार्तिकी, महाशिवरात्र किंवा इतर एकादश्या असतील तर येणारा पाहुणा उपास करतो हे माहिती असल्यास त्याला 'विचारून' केळी दिली जाते.  रोजच्या कॉफीत आणि चहातही कोणी वेलदोडे टाकत नाही. एखाद्या पदार्थात वेलदोडे टाकल्यानंतर शिल्लक राहिलेल्या सालांची भुकटी करून टाकतात असे निरीक्षण आहे.

आपला,
(बल्लवाचार्य) आजानुकर्ण