भारतिय परंपरेत पाहुणचार अगत्यास फारच महत्त्वाचे मानले आहे. अतिथी देवो भव ! आपल्या दारी चालून आलेला अतिथी हा साक्षात देवच आहे असे समजून आपण त्याचा स्वागत सत्कार करतो. त्यास नैवेद्य म्हणजे जे काही आपल्या घरी शिजविले असेल ते आपण भक्ती भावाने अर्पण करतो. प्रत्येक प्रांताचे विशिष्ट पदार्थ हि खासियत म्हणून ओळखली जाते.
मराठी माणुसही त्याला अपवाद नाहि. पण मराठी अगत्याची एक खासियत आहे ते म्हणजे मागितल्याशिवाय काहिहि न देणे. माझा . उत्तर
भारतातिल  अनुभव असा आहे कि घरात गेलो कि लगेच पाण्याचा ग्लास भरून त्या सोबत काही तरी घासभर गोड अथवा नमकीन बशित
दिलेच जाते. पुणेरी अगत्य तर केवळ पुण्यातच दिसते. कोरा चहा तोही बिस्किटा शिवाय देणे तर दारिद्र्य रेषेखालिल लोकांनाही आवडत 
नाही पण मराठी घरात मात्र चहाच दिला जातो व नंतर आता टळा म्हणून सांगण्यात येते.
शोभा डे यांचा लेख मि घरी आलेल्या सकाळ मध्ये वाचला त्यावर एवढी चर्चा होइल असे वाटले नव्हते. पण खरोखरच आपण अगत्याबद्दल
इतर प्रांताच्या पेक्षा कमीच पडतो.
आपण होउन आपली परखडपणे समिक्षा करणे हे सुद्रुढ समाजाचे लक्षण आहे. आपल्याच तोंडाने आपलिच स्तुती करणे ह्याला काय अर्थ
आहे?