आम्ही देखील मूळचे कोकणातलेच पण आई-वडीलांचा जन्मही मूंबईतलाच त्यामूळे 'मालवणी' थोडीफार समजते, पण बोलता मात्र अजीबात येत नाही. त्यामूळेच मालवणीतील/ कोकणातील म्हणी-वाक्प्रचार तीतकेसे माहीत नव्हते/नाहीत. ते व्हावेत ह्यासाठीच काही दीवसापूर्वी 'मालवणी बोली भाषेतील म्हणी' हे विद्या प्रभू लीखीत पूस्तक वीकत घेतले होते. त्यातीलच काही उदाहरणे :-
- 'आळशी उठला नि शेंबडा शिंकला. (आळशी माणसाला कूठलही नीम्मीत्त काम टाळण्यासाठी पूरे असतं.)
- 'भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत'.. (एखादी अडचण अंगावर कोसळली पण ती सोडवता-सोडवता त्यातून दूसरं एक काम घडून गेलं. )
-'काप गेले नि भोका रवली'... ('काप' हे स्त्रियांचं जून्या काळाचं कर्णभूशण. दूर्दैवाने वैभव गेले, गरीबी आली आता उरल्या सूरल्या आठवणीत माणूस रमू पाहतोय. )
-सतीश रावले