वामी शब्द आवडला.

एका ठिकाणी एफ. एम. शब्दाचे मराठीकरण करू नये असे एका मराठी भक्ताने (?) म्हटले आहे. पण माझे म्हणणे असे 
की शब्द नवीन तयार केला आणि सतत वापरला की भाषा वाढते,  तिचा वापर वाढतो.

दुसरे म्हणजे तो शब्द सतत वापरला की जनमानसात रुजतो. उदा. जेव्हा मेयरला प्रतिशब्द म्हणून महापौर शब्द मराठी 
भाषा तज्ञांनी सुचविला तेव्हा सगळ्यांनी त्याची महा-पोर अशी हेटाळणी केली.  पण आज तोच शब्द सतत वापरामुळे 
जनमानसात रुजला आहे आणि आदराने उच्चारला जातो.  

सारांश - टीकाकारांकडे काणा डोळा करावा आणि आपसात मराठीचा वापर वाढवावा. 

असो. आपल्या पाठिंब्याबद्दल आभार.