खरोखर लेख वाचून शोभा डे ह्यांना काय म्हणायचे आहे कळले नाही.
बहुधा त्या कुठेतरी बाहेर देशात गेल्यात आणि त्यांना तिकडचे खाणे खूप आवडलेले दिसतेय. 
किंवा, मग पाश्चिमात्य म्हणतात - ह्यापुढील पाश्चिमात्य म्हणतात ते कुठे सुरू होते आणि कुठे संपते त्याचा नीट संदर्भ दिला नसेल 
किंवा मग
कोण काय खातो त्याच्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखता येते. आपण जे अन्न खातो,
त्यासारखीच आपली जडणघडण होते, यावर तर माझाही विश्वास आहे.
ह्याप्रमाणे त्यांनी तसेच खाल्ले होते का?
कुठल्याही मराठी घरात पोहोचा- पहिल्यांदा विचारतात पाणी हवे का? देतात काय तर पाणी.
आपल्याकडे (पूर्ण भारतात) जुनी पद्धत आहे कोणी पाहुणा आला तर सर्वात आधी पाणी देण्याची. आता फक्त त्यात विचारणे आले. आणि पाणी विचारल्यावर आणखी काय देणार? दारू? बीअर? तो बहुधा फक्त गोव्यातच देत असतील.
गोंयकर पाणी देत नाहीत - ते देतात थेट पाणी.....
ह्या वाक्याचा अर्थ काय आहे हो?
त्या लेखावर प्रतिक्रिया देण्याची सोय नाही आहे. नाही तर त्याचाही प्रयत्न केला असता.