<<पण खरोखरच आपण अगत्याबद्दल इतर प्रांताच्या पेक्षा कमीच पडतो. >>
पुन्हा एकदा लिहिते की दरिद्री व चिंगुसपणा हे गुण प्रादेशिक नाहीत.. गरीबी असेल तर बंगाली काय गुज्जू काय किन्वा आणखी कोणी काय, समानच वागणार. खायला घरी काही नाही तर अगत्यात कमीच पडणार ना.
<<आपण होउन आपली परखडपणे समिक्षा करणे हे सुद्रुढ समाजाचे लक्षण आहे. आपल्याच तोंडाने आपलिच स्तुती करणे ह्याला काय अर्थ आहे? >>
बरोबर आपणहून आपली स्तुती नकाच ना करू पण उगाचच नावे ठेवाण्यात तरी काय अर्थ आहे? हे म्हणजे असे झाले की पाहा शेजार्याचा मुलगा काय हुशार आहे धो धो मार्क्स मिळवतो दर वर्षी नहितर आमच हे कार्ट.. जेमतेम काठावर पास होतय कसबस.. असे परखडपणे बोलून स्वताचा मुलगा तर दुरावला जाइलच पण त्याचा अत्मविश्वासही दुखावला जाइल.जे फार घातक असेल
<<शोभा डे यांचा लेख मि घरी आलेल्या सकाळ मध्ये वाचला त्यावर एवढी चर्चा होइल असे वाटले नव्हते. >>
कारण आपल्याला या गोष्टींची सवयच जडली आहे. काही वावगे वाटेनासे झाले आहे. आपण एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडुनही देतो.
चु. भु. द्या̱. घ्या.