आम्ही आल्या गेल्याला स्टीलच्याच भांड्यातून पाणी देतो. मात्र तो ग्लास नसून एक प्रकारचे भांडे असते ज्याला फुलपात्र
म्हणतात (दुर्दैवाने आंतरजालावर त्याचे चित्र मात्र मिळू शकले नाही).
आमच्याकडे ही जाड, कमीत कमी ३०-३५ वर्षे जुनी पण अजूनही चकाकती भांडी आहेत. त्यातून पाणी कमीपणा
कसला? ही तर परंपरा आहे, ती जपली पाहिजे. पंजाबात नाही का अजूनही पितळेच्या विशाल ग्लास मधून लस्सी देत?