आम्ही लहानपणापासून या गणपतीला जातेय... पण येवढी प्रचंड गर्दी कधीच नव्हती! जेव्हापासून गर्दी सुरू झालीय तेव्हापासून जाणेच बंद!

लालबाग मधील हा एकमेव गणपती असा होता जो कुणीही कधीही येवून बघून जावू शकत होता. जिथे आम्ही रांगा कधी पाहील्याच नव्हत्या. तेव्हाही तो नवसालाच पावणारा होता आणि आताही!

नंतर या मिडीयाची(भैया मिडीया) नजर जेव्हा पासून पडलीय तेव्हा पासून गणेशोत्सवाच्या दिवसात येथे लोकांचा पुरच्या पुरच येतोय. आणि या पुरात मराठी कमी व अमराठीच जास्त असतात!

हिच गोष्ट श्री सिद्धीविनायकाला पण लागू होते. वयस्कर लोक सांगतात की हा गणपती आधी एका झोपडी वजा जागेत 
होता. नंतर तिथे एक छोटे मंदीर बांधले गेले.

पण ज्या दिवशी खरेतर रात्री अमिताभ अनवाणी अंधेरीहून चालत दर्शनासाठी आला त्या रात्री चमत्कार घडला.  
एकाएकी ते मंदीर जागृत देवस्थान बनले. पुढचा इतिहास तर सांगायलाच नको. मनोजकुमार मुळे शिर्डीचे 
साईबाबा प्रकाशात आले आणि अमिताभमुळे श्री सिद्धीविनायक.  

पण दादरकरांचा खरा गणपती म्हणजे उद्यान गणेश. कधीही जा,  मनमोकळे दर्शन होते.  एकदा रात्री तर 
तिथे सचिन तेंडूलकर आला होता नव्या गाडीची पूजा करून घ्यायला. पण तो प्रसार माध्यम वेडा नसल्याने हे 
जास्ती लोकांना माहित नाही.