तथाकथित राष्ट्रीय नेतृत्व , उद्दाम माध्यमे नेहमीच महाराष्ट्राचा दुःस्वास करत आलेली आहे. राजस्थानात २ आठवडे सर्व नाकाबंदी करून राष्ट्रीय पक्ष त्याकडे दुर्लक्ष करतात पण एक समोसा स्टॉल तुटला तर लोकसभेत गोंधळ घातला जातो. दुर्दैव हे की मराठी माणसाची "मला काय त्याचे " वृत्ती. सर्व वाहिन्या आणि वर्तमानपत्रातील मतचाचण्यांत ८०% हून अधिक लोकांनी या विषयाला पाठिंबा दिला पण रस्त्यावर मराठीत बोलायलाही लाज वाटते. किंवा याने काय होणार अशी पळवाट शोधायची. आता हेच बघा ना मनोगतवर देखील याविषयावर मत देणाऱ्यांची संख्या नगण्य असते.