केळी आणि कॉफी हे पदार्थ मी आजतागायत एकत्र खाल्लेले/दिलेले नाहीत. आणि स्टीलच्या पेल्यातले पाणी गरीब आणि काचेच्या ओशट ग्लासातले पाणी चांगले काय?
चित्रविचित्र दागिने घालून मिरवण्यापेक्षा महोदया शोभा डे यांनी आजवर काय केले आहे? त्यांचा मागच्या लेखातही त्या कशा एकदा मराठी माणसाला चीनच्या भिंतीवर भेटल्या आणि मग त्याने कसे इंग्रजी बोलायला सुरुवात केली आणि मग यांनीच कसे मराठी वापरले वगैरे गुणगान आले होते. (मी तरी ह्या बाईला एकदाही मराठी बोलताना पाहिलेले नाही. )
उच्चभ्रू वगैरे म्हणवणाऱ्या, पार्ट्यांना हजर असणाऱ्या आणि 'बदलता भारत' वगैरे पुस्तकं लिहणाऱ्या असल्या लोकांचा आजकाल फार सुळसुळाट झाला आहे.