आजी २ म्हणी बरेचदा म्हणायची.  १) *दा पण नांदा  २) आळश्याला त्रिभुवनाचे ज्ञान.  

दुसऱ्या म्हणीच्या समर्थनार्थ ती छान गोष्ट सुद्धा सांगायची.  एकदा एका पाठशाळेत गुरुजी शिष्यांना शिकवित असतात.  
ते एका शिष्याला म्हणतात,  जा रे बाळा,  बाहेर पाऊस पडतोय का ते पाहून ये.  शिष्य असतो मुलखाचा आळशी.  तो 
पटकन गुरुजींना म्हणतो,  "गुरुजी,  गुरुजी,  ते पाहा आत्ताच मांजर आत आले.  त्याच्या पाठीवरून हात फिरवले की 
लगेच कळेल बाहेर पाऊस पडतोय की नाही ते".