वास्तवदर्शी, मनाला भिडणारी कविता आवडली.
एक भितीचा पापुद्रा जगण्याला चिकटे
- ही ओळ अतिशय बोलकी आहे.
दुर्दैव देशाचे की तुम्ही दिलेले शीर्षक अत्यंत समर्पक आहे. वर्षानुवर्षे हे अरण्यरुदनच ठरत आलेले आहे व परिस्थितीत बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दहशतवादाच्या प्रत्येक कृत्यानंतर राजकारण्यांची एकमेकांवर चिखलफेक, दोषारोपांचे खेळ, निर्लज्ज समर्थने व सारवासारव, प्रसारमाध्यमांनी चार दिवस TRPसाठी उडवलेला धुरळा, आपण सर्वांनी चहाचे घुटके घेत घेत केलेल्या ' देशाचे काय होणार'छाप टिप्पण्या - आणि चार दिवसांनी पुन्हा 'सारं कसं शांत शांत'...
तो "...संभवामी युगे युगे" चे वचन देणारा हल्ली कोणाला दिसला आहे का ?