छान कविता. परिस्थितीचे नेमके आकलन.
मात्र, प्राप्त परिस्थितीतून मार्ग दाखवते ती कला खरी प्रबोधक!

म्हणून माझे परीने उत्तराचा प्रयास करतो आहे:

अदृश्याशी युद्ध, कशी जिंकावी बाजी?

कानोसा घ्यावा, करतो युद्ध कुणाशी
अदमास करावा, झुंझत कोण कुणाशी
येईल रव अभद्र, दिशेने ज्याही,
त्यावरी करुनी वार, अशी जिंकावी बाजी

भाबडे जग खरे, की ते भासवी तैसे?
हतबलता छळते, माणुसकीला हरते!
उमजून सर्व हे, याद करावी ताजी
विपरित रीतीला त्यजून जिंकू या बाजी