साय + दूध एकत्र केल्यावर ते मिश्रण विरजण्यासाठी तसेच किती काळ ठेवावे म्हणजे ते लोणी काढण्याइतपत तयार होईल?
साध्या दह्याकरता जितका वेळ लागतो तितकाच वेळ सायीचे दही बनण्यासाठी लागतो. सायीचे दही बनवताना मात्र दही थोडे आंबट असावे आणि जास्त घालावे म्हणजे एक तर दही लगेच लागते. विरजणासाठी दही कमी पडले तर कदाचित दही कडवट बनण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ताकही कडवट बनते. रात्री दही लावले तर सकाळी दही बनते आणि दही बनल्यावरही थोडेसे जास्त ठेवले तरी चालेल.
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!