प्रतिसाद दिल्याखेरीज राहवत नसण्याची आत्यंतिक गरज, आणि

सरळसोट भाषांतरांची कोडी बनवण्याची आत्यंतिक गरज

माझ्या मते सारखीच अनाकलनीय आहे.

कदाचित कोडे न म्हणता केवळ भाषांतर म्हटले असते तर आपला प्रतिसाद न मिळता, हे एक कारण असू शकेल.

मनोगताने, कोडे या सदरात काय घातले जाते यावर थोडे लक्ष द्यायला हरकत नाही.>> अजिबात नाही.

स्पष्ट बोलण्याचा राग का बरे मानावा? मानू नयेच.

मात्र, कोड्यापलीकडे भाषांतरात काही आनंदनिर्मिती खरोखरच होत असावी का?
ह्या तुमच्या मनातील खऱ्याखुऱ्या प्रश्नाला, मी खरेखुरे उत्तर देण्याचा प्रयत्न, माझ्या इथेच प्रकाशित झालेल्या
"पद्यानुवादांचा रसास्वाद" या लेखात केलेला आहे. तुमचा प्रश्न जर असाच काहीसा असेल तर लेख अवश्य वाचा,
ही नम्र विनंती.

एरव्ही इकडे दुर्लक्ष केलेत तरीही मला वाईट वाटणार नाही.

मनोगताला तुम्ही दिलेला सल्ला मनोगत लक्षात घेईलच.